Skip to main content
www.mdkamble.in

✳️केस गळणे : फक्त बाह्य समस्या नाही, तर जीवनशैलीचे प्रतिबिंब Hair Fall: Not Just an External Issue, But a Reflection of Lifestyle

✳️केस गळणे : फक्त बाह्य समस्या नाही, तर जीवनशैलीचे प्रतिबिंब
♦️आजकाल पैसा असो वा नसो, 
👉 केस गळणे, केस पातळ होणे, टक्कल पडणे या समस्या खूप वाढल्या आहेत.
पण प्रत्येक गोष्टीवर घाईघाईने उपाय, औषधे किंवा सोशल मीडियावरील सल्ले वापरणे योग्य नाही.

♦️ *केसांच्या समस्यांची काही प्रमुख कारणे* 
१. अति विचार आणि ताण (Stress) आजच्या काळात सतत चिंता, तुलना, भविष्याची काळजी यामुळे
* मानसिक ताण वाढतो. Stress hormones मुळे केसांच्या मुळांवर परिणाम होतो.

२. लहानपणापासून योग्य तेल न लावणे
* पूर्वी खोबरेल तेल, भृंगराज, आवळा यांसारखी नैसर्गिक तेलं वापरली जात. आज अनेकांनी ती सवय सोडली आहे.

३. केस सतत मोकळे ठेवणे
* विशेषतः स्त्रियांमध्ये सतत मोकळे केस ठेवणे, उडणारे केस, गरम हवा व धूळ यामुळे केस कमकुवत होतात.

४. अयोग्य आहार
* पूर्वी घरचे, पौष्टिक, ताजे अन्न जास्त होते.
आज : जंक फूड, मैदा, थंड पदार्थ, कोल्ड ड्रिंक्स. 
* यांचा शरीरावर आणि केसांवर परिणाम होतो. म्हणूनच २०–३० वयातही केसांच्या समस्या वाढताना दिसतात.

५. केमिकल्सचा अति वापर
* Chemical shampoos, Shiners, Hair colours, अनियमित उत्पादने

👉 यामुळे केसांची नैसर्गिक ताकद कमी होते.

🧠 पोट आणि केसांचा संबंध
हा महत्त्वाचा मुद्दा आहे.
जर पचन बिघडले, जंक फूड जास्त असेल तर

👉 शरीराचे रक्त आणि ऊर्जा पचनाकडे जास्त जाते.
म्हणून :
डोक्याकडे रक्तप्रवाह कमी
डोकेदुखी
मायग्रेन
केस गळणे
अशा समस्या वाढू शकतात.

🧘 *ध्यान आणि मानसिक शांतता* 
Meditation, ध्यान, प्राणायाम यामुळे

👉 डोक्यातील रक्तप्रवाह सुधारतो
👉 मन शांत राहते
👉 झोप सुधारते
याचा अप्रत्यक्ष फायदा केसांनाही होतो.

✨ *तात्पर्य* 
* केस गळणे म्हणजे नेहमी मोठा रोग असे नाही
* प्रत्येक जाहिरातीवर किंवा YouTube उपायांवर लगेच विश्वास ठेवू नका
* सतत केमिकल्स वापरणे टाळा
* केस कायम मोकळे ठेवू नका
* योग्य वेळी योग्य अन्न घ्या
* ताण कमी करा

👉 काही गोष्टी पूर्णपणे आपल्या हातात नसतात.
आज अनेक प्रसिद्ध आणि यशस्वी लोकांनाही केसांच्या समस्या असतात.
म्हणून अति चिंता न करता —
* शरीर, मन आणि जीवनशैली संतुलित ठेवणे महत्त्वाचे आहे.

✳️ Hair Fall: Not Just an External Issue, But a Reflection of Lifestyle
♦️ Whether you have money or not, 
👉 Hair fall, thinning hair, and baldness have become very common today. 
But rushing to try quick fixes, medicines, or social media advice for every issue isn’t the right approach.

♦️ Some Key Causes of Hair Problems 
Overthinking and Stress 
Constant worry, comparison, and anxiety about the future increase mental stress. Stress hormones directly affect the hair roots. 

Not Oiling Hair Since Childhood 
Earlier, natural oils like coconut, bhringraj, and amla were used regularly. Today, many people have stopped this habit. 

Keeping Hair Open All the Time 
Especially for women, open hair is exposed to wind, heat, and dust, which weakens the strands. 

Improper Diet 
Earlier, home-cooked, nutritious, fresh food was common. 
Today: junk food, refined flour, cold items, cold drinks. 
These affect both body and hair. That’s why hair problems are seen even in people aged 20–30. 

Excessive Use of Chemicals 
Chemical shampoos, shiners, hair colours, and irregular products reduce the natural strength of hair.

🧠 The Connection Between Gut and Hair 
This is important. If digestion is weak or junk food intake is high, 

👉 The body sends more blood and energy to digestion. 
As a result: 
Blood circulation to the scalp reduces 
Headaches 
Migraines 
Hair fall 
These problems can increase.

🧘 Meditation and Mental Calmness 
Meditation, dhyan, and pranayama help by: 

👉 Improving blood flow to the head 
👉 Calming the mind 
👉 Improving sleep 
This indirectly benefits hair too.

✨ Summary 
Hair fall is not always a sign of a major illness. 
Don’t trust every ad or YouTube remedy instantly. 
Avoid constant use of chemicals. 
Don’t keep hair open all the time. 
Eat the right food at the right time. 
Reduce stress. 

👉 Some things are not fully in our control. 
Even many well-known and successful people face hair issues today. 
So instead of worrying too much — 
Focus on keeping your body, mind, and lifestyle balanced.