Skip to main content
www.mdkamble.in

🌸सुंदरता — एक विचार  Beauty — A Reflection

🌸 सुंदरता — एक विचार
*सुंदरता?*
कोठे मिळते ती? माहित नाही. आपण तिला या विश्वात सतत शोधत असतो — सुंदर चेहऱ्यांत, आकर्षक वस्तूंमध्ये किंवा निसर्गात.

*ती कोण देतो?*
कोणी ठाम सांगू शकत नाही. कदाचित दैव, कदाचित देवच. पण खरे सांगायचे झाले, तर आपण स्वतःही स्वतःला सुंदर बनवू शकतो — जसे फूल स्वतः फुलते तसे.

*आपण सुंदरतेचा शोध का घेतो?*
कारण सुंदरतेमुळे मन प्रसन्न होते, आनंद मिळतो. पण ही सुंदरता टिकते का? नाही. कारण शुक्र हा सौंदर्याचा अधिपती असला, तरी तो नाशिवंत आहे.
उदाहरणार्थ — फूल कोमेजते, लहान मुलाचे सौंदर्य वयानुसार कमी होते, आणि काळानुसार चेहऱ्यावरही बदल येतात.

*मग लोक सुंदरतेच्या मागे एवढे का लागतात?*
कारण सुंदरतेकडे नैसर्गिक आकर्षण असते. प्रत्येकाला स्वतःला सुंदर ठेवायची इच्छा असते. पण त्या आकर्षणामागे भोगलालसा दडलेली असते.
फुलाचा सुवास, सुंदर गाडी, आकर्षक वस्तू, सुंदर स्त्री किंवा पुरुष, सुंदर घर — प्रत्येक ठिकाणी “हे माझेच असावे” अशी इच्छा असते.

*विश्वविधात्याने हे असं का केलं असेल?*
कारण त्याने प्रत्येक चांगल्या गोष्टीत सौंदर्य आणि आकर्षण ठेवले आहे. पण हेच आकर्षण माणसाला पैसा, वेळ आणि जीवनाच्या खऱ्या ध्येयापासून दूर नेते.

*सुंदरतेकडे कसे पाहावे?*
सुंदरता ही शुक्राच्या अधीन आहे, आणि शुक्र दैत्यगुरू शुक्राचार्याच्या अधीन.
म्हणजेच, सुंदरतेच्या मागे दैत्यशक्ती दडलेली असते.
तर ज्ञानाच्या मागे गुरुशक्ती असते.
म्हणून सुंदरतेकडे पाहताना भोगाची भावना येते का, हे प्रत्येकाने स्वतःला विचारावे.

*आपण काय करावे?*
सुंदरता ही विधात्याने दिलेली निसर्गदत्त देणगी आहे, असे समजून तिचे कौतुक करावे — पण आसक्ती नको.
जर सुंदरता आपल्या व्यक्तिमत्त्वात, लेखनात, किंवा आदर्श कर्मात असेल, तर त्याचा अभिमान बाळगावा.
पण शरीर, घर, चेहरा, किंवा निसर्गातील सौंदर्य — ही सर्व गोष्टी क्षणभंगुर आहेत, हे लक्षात घेऊन गर्व करू नये.

*मग लोक सुंदर दिसण्याचा प्रयत्न का करतात?*
कारण आकर्षक दिसणे ही सहज इच्छा आहे. पण अति आकर्षकतेमुळे अपेक्षा वाढतात.
त्या अपेक्षा पूर्ण करण्याची ताकद आपल्या हातात आहे का, हे विचारणे आवश्यक आहे.
कारण लोकांच्या नजरेचा दोषही सांभाळावा लागतो.

*तात्पर्य:*
सुंदरता ही अपेक्षा वाढवणारी आणि भोगलालसेला प्रवृत्त करणारी असली, तरी सहज सुंदरताच योग्य आहे.
सीतेच्या सौंदर्यामागे रामायण घडले, आणि द्रौपदीच्या सौंदर्यामुळे महाभारत पेटले.

म्हणून माझे मत असे —
सुंदरता असावी, पण ती आपल्याला विवेक आणि कर्तव्यापासून दूर नेणारी नसावी. 🙏

🌸 Beauty — A Reflection

What is beauty?
Where is it found? No one really knows. We keep searching for it in this world — in beautiful faces, attractive objects, or in nature.


Who gives beauty?
No one can say with certainty. Perhaps fate, perhaps God. But truthfully, we can also make ourselves beautiful — just like a flower blooms on its own.


Why do we seek beauty?
Because beauty brings joy and pleases the mind. But does it last? No. Even though Venus is considered the lord of beauty, it is still perishable.
For example — flowers wither, a child’s beauty fades with age, and even faces change over time.


Then why are people so drawn to beauty?
Because beauty naturally attracts us. Everyone desires to look beautiful. But behind this attraction lies indulgence and desire.
The fragrance of a flower, a beautiful car, attractive objects, a handsome man or woman, a lovely house — everywhere there is a hidden desire: “This should be mine.”


Why did the creator design it this way?
Because beauty and attraction are embedded in everything good. But this very attraction can pull a person away from money, time, and the true purpose of life.

How should we view beauty?
Beauty is said to be governed by Venus, and Venus by Shukracharya (the teacher of demons).
This suggests that behind beauty lies a subtle demonic force, while knowledge is guided by divine wisdom.
So one must ask: does beauty awaken indulgence within me?


What should we do?
We should appreciate beauty as a natural gift from the creator — but without attachment.
If beauty exists in our personality, writing, or noble actions, we can take pride in it.
But beauty of the body, home, face, or nature — all are temporary, so we should not be arrogant about them.


Why do people try to look beautiful?
Because it is a natural desire to appear attractive. But excessive beauty raises expectations.
We must ask ourselves: do we have the strength to fulfill those expectations?
Because we also have to bear the burden of others’ perceptions.


Conclusion:
Beauty may increase desires and lead to indulgence, but natural simplicity in beauty is best.
The beauty of Sita led to the Ramayana, and Draupadi’s beauty sparked the Mahabharata.

So, in my view —
Beauty should exist, but it should not take us away from wisdom and duty. 🙏